PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 4, 2024   

PostImage

अटीतटीच्या लढतीत देशात तिसऱ्यांदा फुलला कमळ


अवघ्या देशाला लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता लाभली होती आणि आज उत्सुकता पूर्णत्वास आली. अबकी बार 400 पारचा नारा देत पंतप्रधानांनी संपूर्ण देश पिंजून काढला.विरोधकांना चारी मुंड्या चीत करीत निर्विवाद बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

 देशातील विरोधी पक्ष इंडिया आघाडीने मोदीच्या NDA ला जादुई आकडा ओलांडू द्यायचाच नाही,असं चंग बांधला होता.मोदी विरोधी पक्षांना एक छत्र छायी खाली येऊन मोदीचा विजय रथ रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला परंतु विरोधी पक्षाचे मनसुबे उधळत लावून मोदी ने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले.

महत्त्वाचे राज्य मोदीच्या हातातून हिसकविण्याचा प्रयत्न केल्या गेला हे सत्य नाकारू शकत नाही परंतु मोदीने निर्विवाद वर्चस्व शाबूत राखले,हे तितकंच महत्त्वाचे आहे.म्हणजे देशात पुन्हा एकदा मोदी नंबर वन आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

 निवडणुका म्हटल्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे काही नवीन नाही परंतु विकासाच्या मुद्द्यांपासून तर थेट जाती धर्मा पर्यंत पोहोचलेली लोकसभा निवडणूक कोण जिंकली याची खात्री नसताना देखील बहुमताचा आकडा पार करीत मोदीने अटीतटीच्या लढतीत देशात तिसऱ्यांदा कमळ फुलवून विरोधकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत तिसऱ्यांदा सत्तेची चाबी मिळवण्यात यश संपादन केले.

 नरेंद्र मोदीच्या भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता नाही आलं तरी परंतु मित्र पक्षांच्या मदतीने जादुई आकडा पार करीत निर्विवाद यश संपादन केले हे सुद्धा तितकच महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीची हवा संपुष्टात येईल की काय ? याची भीती मोदीच्या कार्यकर्त्यांना देखील होती परंतु निर्विवाद यश संपादन केल्यामुळे ती भीती आता दुरापस्थ झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही.

तिसरी बार मोदी सरकार


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 1, 2024   

PostImage

नवरदेव गुडग्याला बाशिंग बांधून सज्ज,मात्र वरात निघायला तीन दिवसांची अवधी


एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून विकासाच्या कामांपासून तर जाती धर्मा पर्यंत या वर्षीची लोकसभा निवडणूक जाऊन पोहोचली.आपणच विजयाचे शिल्पकार आहोत किंवा आपलाच पक्ष कसा वर चढ आहे,हे दाखवून देण्याच्या केविलवाना प्रयत्न करताना राजकीय पुढारी आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहोत आणि एकदाची देशाची लोकसभा निवडणूक पार पडली.

आता राजकीय पुढारी उमेदवार आणि देशातील जनता मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे,ती म्हणजे निवडणुकीच्या निकालांची आणि हे वावंगच आहे.उत्सुकता असायलाच पाहिजे कारण आपण आपल्या अधिकाराचा मत मतपेटीत टाकून जनतेच्या प्रतिनिधी ठरवत असतो. निकाल चार दिवसांवर येऊन पोहोचला आहे परंतु कित्येक राजकारणी लोकांना कदाचित असाही वाटत असेल की चार दिवस म्हणजे खूप दूर आहेत,आजच असता तर बरं झालं असतं.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे परंतु निकालाची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच आहे.ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत म्हणजे चाय टपरी पासून तर पेट्रोल पंपापर्यंत.

 कित्येक उमेदवारांचे छातीचे ठोके धडधडायला सुरुवात झाली आहे आणि जो स्पर्धेत आहे,जिथे काटेरी लढत आहे तिथल्या उमेदवारांचे जरा जास्तच धडधड चालू आहे.उमेदवारांचे तर आहेतच परंतु त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे तर उमेदवारांपेक्षाही जास्तच धडधड चालू आहे.

यावर्षी उन्हाच्या तडाख्याने जनतेचा जीव कासाविसा होऊन गेलाय आणि देशातील जनता रोहिनीच्या पावसाची जशी आतुरतेने वाट पाहत आहे अगदी तसंच राजकीय पुढारी लोकसभा निवडणुकींच्या निकालाची वाट पाहत आहोत,एवढं मात्र नक्की आहे.

लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे आहेत त्यांची परीक्षा संपली आता वाट फक्त निकालांची आहे परंतु चिंता करू नका जास्त दिवस संपले आहेत आणि तीन दिवसांनी निकाल लागणार आहे. म्हणजे एखदाच सोक्षमक्ष जनतेसमोर येणार आहे कोण कितीने पाणी मे है ? चार जूनला माहित होणारच आहे. म्हणजे आज गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारा नवरदेवांची तीन दिवसानंतर वाजत गाजत वरात निघणार आहे,हे मात्र नक्की.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 12, 2024   

PostImage

अपक्ष उमेदवार विनोद मडावी ने उडवीली राष्ट्रीय पक्षांची झोप,यंग लढेंगे …


गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसा तसा रंग चढायला सुरुवात होताना दिसतो आहे.अपक्ष उमेदवार विनोद गुरुदास मडावी हा चळवळीतून समोर आलेला चेहरा.अगदी उमदा तरून वय 32 वर्षे आणि गरिबाचा मुलगा,निशाणी (चिन्ह) अंगठी घेऊन लोकसभेवर पोहोचण्याचा निर्धाराने निवडणुकीत उडी घेतली.

यंग लढेंगे जंग,चा नारा देत प्रचारात भरारी घेताना दिसतो आहे आणि 32 वर्षांचा तरुण आणि गरीब शेतकऱ्यांचा आदिवासी पोर निवडणूक लढतोय, म्हणून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.काँग्रेस आणि भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांनाजनता देखील कंटाळलेली आहे,आणि तसंच स्वतः मतदार देखील बोलताना दिसतो आहे.

विनोद मडावे हा 32 वर्षांच्या तरुण लोकसभा निवडणूक लढत आहेत.अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रणांगणावर आपले अस्तित्व पणाला लावून राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची झोप उडवणारी ठरू शकते.कारण तसं जनतेच्या प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

 अपक्ष उमेदवार विनोद मडावी हा लोकसभा निवडणूक जिंकणार नाही,हे जरी खरं असेल पण प्रस्थापितांचे अस्तित्व पणाला लावू शकतो,हे मात्र नक्की आहे.आजपर्यंत जरी प्रस्थापित पक्षांनी अंगठी कडे नजर अंदाज केलेले असेल,परंतु जशी जशी निवडणूक जवळ येत आहे,तसा तसा अंगठी,पंजा आणि कमळ या चिन्हांचे डोकेदुखी वाढत आहे. अपक्ष उमेदवार प्रस्थापितांना येणाऱ्या निवडणुकीत कुणाचे अस्तित्व मिटवेल,हे मात्र निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

April 5, 2024   

PostImage

निवडणुकीच्या तोंडावर सरड्यासारखे रंग बदलविणारे राजकीय पुढारी


देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकारणात रंग यायला सुरुवात झाली.अगदी चाय टपरी पासून तर पेट्रोल पंपापर्यंत नुसता राजकारणावरच बोललं जातंय.आपल्या क्षेत्राचे तिकीट कुणाला मिळाली ? पासून तर कोण बाजी मारणार ? इथपर्यंत.

प्रश्न बाजी कोण मारणार याचा नाही,परंतु सारासार विचार करायला गेलं तर राजकारणाच्या भ्रष्ट आणि स्वार्थीपणाचा विचार करावा लागेल.कारण सरडा जसा आपला रंग बदलवितो अगदी त्याचप्रमाणे राजकीय पुढारी निवडणुका डोळ्यासमोर आल्या की पक्ष बदलवितांना दिसतात.

एखाद्या राजकीय पुढार्‍याला पक्षांन टिकीट नकारलं तर बिघडलं कुठं ? कुणालातरी पक्ष संधी देतो आहे,त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा आणि समोरच्या उमेदवाराला निवडून आणा,पण असं होताना दिसत नाही.आपल्याच पक्षातील नेत्यावर कुरघोडी करून त्याच्या विरोधात काड्या करण्याचा काम सुरू असतो पण हे चुकीचा आहे.

कारण निवडणुका येतात जातात सत्ता बदलत राहते आणि बदलत राहायलाच पाहिजे असं जाणकार मतदाराला सुद्धा वाटतं.पक्षांना एखाद्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट नाकारलं तर त्याचे दोन कारणे असतात,एक म्हणजे पक्ष नवीन चेहऱ्याला संधी देत असेल किंवा दुसरं कारण म्हणजे हा उमेदवार त्या पदाच्या लायकीचा नसेल हे दोनच कारणे असू शकतात.

परंतु यात वाईट मानून घेण्याची काहीही गरज नाही,फक्त गरज आहे ती म्हणजे आत्मचिंतन करण्याचे परंतु नेताजी आत्मचिंतन करण्याच्या मनस्थितीत नसतात ते दुसरं पक्ष शोधतात आणि उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्न करतात.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

पंतप्रधान मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी - तेजस्वी यादव


इंडिया आघाडीच्यावतीने ३१ मार्च रोजी दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून देशभरातून जवळपास २८ पक्षांनी एकत्र येत भाजपावर हल्लाबोल केला. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या सभेत बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी असल्याचा टोला लगावला आहे.

 

तेजस्वी यादव नेमके काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदींची गॅरंटी’ अशा स्वरूपाचा नारा दिला आहे. यानंतर ‘मोदींची गॅरंटी’ अशी एक मोहीम भाजपाकडून चालू करण्यात आली. या मोहिमेवर आता तेजस्वी यादव यांनी टीका केली. यादव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी आहे. जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत मोदींची गॅरंटी आहे. मात्र, निवडणुका संपल्यानंतर काही नाही. त्यामुळे मोदींची गॅरंटी ही फक्त निवडणुकीपर्यंत टिकेल”, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

 

 

भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. यावरूनच तेजस्वी यादव यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “भाजपावाल्यांनी निवडणुकीच्या आधीच ४०० पारचा नारा दिल्यामुळे आधीच मॅच फिक्सिंग झाल्यासारखे वाटते आहे. मात्र, भाजपाचे नेते काही म्हणाले तरी जनता हीच देशाची मालक असते. त्यामुळे जनता जे ठरवेल तेच दिल्लीत सरकारमध्ये बसतील. काही झाले तरी या भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा”, असे तेजस्वी यादव म्हणाले.

 

ईडी, सीबीआय भाजपाचे सेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीवेळी काही आश्वासने दिले होते. त्यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी तरुणांना भाजपाच्या खोट्या आश्वासनांना आणि खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. “देशात बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे दुश्मन आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणतीही नोकरी दिली नाही. सर्वच्या सर्व खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे भाजपाचे सेल झाले आहेत”, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 29, 2024   

PostImage

देशातील विरोधी पक्ष कमकुवत !


देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या,मतदानाची वेळ काही दिवसांवर येऊन ठेपले तरी पण विरोधी पक्षांच्या जागा वाटपाच्या तिढा अजून सुटताना दिसत नाही,वेळ फार कमी आहे अशा परिस्थितीत जागावाटप करून वेगाने प्रचाराच्या कामाला लागायला पाहिजे होते परंतु तसं होताना दिसत नाही.पाणी कुठं मुरतंय,हेच कळला मार्ग नाही.

विरोधी पक्ष कमकुवत होत तर नाही ना ? अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आणि आजच्या वातावरणावरून तसंच होताना दिसतो आहे.कारण जागा वाटपात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा,आपापसात आरोप करताना दिसतो आहे.वंचित पक्षाचे मा.प्रकाश आंबेडकरांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांवर करीत आहे.आधीच वाचाळ बोलण्यात मातब्बर असणारे राऊत यांच्यावर आंबेडकर प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.

 वास्तविक ही वेळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नसून एकमेकांना समजून घेण्याची वेळ आहे.एकाथी जागेचा तिढा सुटत नसेल तर जिद्दू करण्यापेक्षा सोडून देऊन मोकळे व्हायला पाहिजे,परंतु तसं न करता हे महाशय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात रममान होताना दिसतो आहेत.

खरं सांगायचं झालं तर विरोधी पक्ष मोदीच्या झंजाविताला घाबरला आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. मोदी पुढे आपण टिकू शकणार नाही कदाचित अशी भीती सुद्धा विरोधकांना सतावत असेल,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

 देशातील आजचा वातावरण पाहता विरोधकांच्या हाती भरपूर मुद्दे आहेत. ही वेळ सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची वेळ आहे आणि आजचा मतदार जागृत असल्यामुळे विरोधकांना जास्त समजावून सांगण्याची गरज नव्हते,परंतु आजच्या घडीला विरोधकांचेच लक्षण ठीक वाटत नाही, हे यावरून स्पष्ट होताना दिसतो आहे.

देशातील सत्ताधारी पक्ष काय करतात हे म्हणण्यापेक्षा,देशातील विरोधी पक्ष काय करतात हे समजून घेणं महत्त्वाचे आहे परंतु तसं होताना दिसत नाही.कदाचित विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्या गेले असतील किंवा मोदीच्या झंजावातीला घाबरले असतील,असं म्हणायला हरकत नाही.

|| केल्याने होत आहे रे,पण अधिक केलीच पाहिजे ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 27, 2024   

PostImage

भाऊंचे अस्तित्व पणाला ! अख्या महाराष्ट्राची नजर एकाच क्षेत्राकडे


देशात निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकारण्यांपासून तर सामान्य माणसांमध्ये चर्चेला जाणारा विषय म्हणजे विजयी होणार कोण ?

संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा आणि ती म्हणजे चंद्रपूर लोकसभा निर्वाचीन क्षेत्राची,अन् कारणही तसंच आहे.राज्याचे वनमंत्री आणि विकासाचे महामेरू मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार म्हटल्यावर विषयच नाही,असं म्हणायला काहीच हरकत नाही.

आणि त्याच क्षेत्रात इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व करीत आहे. रणरागिणी विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर.हे दोन्ही मातब्बर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्या कारणाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष याच लोकसभा क्षेत्राकडे लागले आहेत,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भाजपाचा बालेकिल्ला म्हणजे चंद्रपूर लोकसभा क्षेत्र आणि त्याच बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपाला चारही मुंड्या चित करून आपले वर्चस्व प्रस्थापित करून,आपले नाव लौकिक केला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एकच जागा जिंकता आली आणि तेही भाजपाच्या बालेकिल्यात आणि त्यांच्या निधनानंतर ह्याच क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून धानोरकरांच्या अर्धांगिनीने आता दंड थोपटल्या आहेत.

एकीकडे सुधीर भाऊंना भाजपाचे गड परत आणणे आणि देशाच्या संसदेत आपला आवाज बुलंद करणे,असा दुहेरी प्रवास करताना भाऊंसाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही,पतीच्या निधनानंतर लोकसभेचे नेतृत्व रणरागिणीकडे आल्यामुळे अस्तित्व पणाला लावणे भाग आहे.मे मेरी झांशी नही दूंगी, असंच म्हणण्याची वेळ आता प्रतिभाताईंवर आलेली आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे कोण विजयी होणार ,हे येणारा काळ सांगेल.परंतु चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,हे मात्र नक्की.

||जगण्याचा पाया | चालण्याचे बळ | 

विचारांचे कळ | तुकाराम ||


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 9, 2024   

PostImage

महाराष्ट्र में चार चरण में होगा लोकसभा चुनाव


 

प्रथम चरण-11 अप्रैल:(7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम

 

दूसरा चरण-18 अप्रैल:(10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर

 

तीसरा चरण-23 अप्रैल:(14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले

 

चौथा चरण- 29 अप्रैल: (17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य और मुंबई दक्षिण।